बेंगळूर
विप्रो लिमिटेडने कोविड 19 च्या काळात कंपनीतून कोणालाही काढलेलं नसून येत्या काळातही कर्मचारी कपात केली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण चेअरमन रीषाद प्रेमजी यांनी नुकतेच दिले आहे. 74 व्या वार्षिक सर्व साधारण सभेनंतर ते बोलत होते. दरम्यान उत्पन्नप्राप्ती कमी झाली असल्याने विविध कार्यालयामार्फत खर्चात कपात करण्याचा मार्ग कंपनी राबवत आहे. सध्याला विप्रोचे 95 टक्के कर्मचारी घरातून काम करत आहेत. भविष्यात कामाचे नवे मॉडेल तयार केले जाईल, ज्यातून वर्क फ्रॉम होम व वर्क फ्रॉम ऑफिस दोन्ही संकल्पना व्यवस्थितरित्या राबवल्या जातील. पुढील 12 ते 18 महिन्यात हे नवे मॉडेल विकसित होणार असल्याचे रीषाद प्रेमजी यांनी सांगितले.