विप्रो 10,500 कोटींना ब्रिटनच्या ‘कॅप्को’ची करणार खरेदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील दिग्गज आयटी कंपनी म्हणून विप्रोची ओळख आहे. विप्रो आता आतापर्यंतचा सर्वात मोठा क्यवहार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यामध्ये कॅप्को या जागतिक पातळीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सामाजिक सेवा देणारी कंपनी असून तिचे कंपनीचे मुख्यालय लंडन येथे आहे. या कंपनीची खरेदी विप्रो करणार असून आतापर्यंत सर्वात मोठा व्यवहार या खरेदीमधून होणार असल्याचे संकेत आहेत. आयटी कंपनी ब्रिटनची कंपनी कॅप्कोची खरेदी करणार असून हा व्यवहार जवळपास 1.45 अब्ज डॉलर म्हणजे (10,500 कोटी रुपये) मध्ये होणार आहे. आगामी काळातही दोन्ही कंपन्यांचे अधिग्रहण हे सर्वात मोठे अधिग्रहण म्हणून नेंद होणार असल्याची माहिती आहे.
विप्रोने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कॅप्कोसोबत आल्याने माहिती तंत्रज्ञानासोबत अन्य सेवा क्षेत्रातील मजबूत स्थिती प्राप्त होणार असल्याचे दाट संकेत आहेत. सदरचा व्यवहार हा जूनअखेरीस पूर्ण होण्याचे संकेत आहेत. हा व्यवहार रोखीने होणार आहे. कॅप्कोही स्वतंत्र एंटिटिकडून परिचालन करत राहणार आहे. कॅप्कोचे अधिग्रहण जुलै 2020 पासून आतापर्यंत विप्रोचे चौथे अधिग्रहण राहिलेले आहे.
कॅप्को किती जुनी कंपनी
कॅप्को 1998 मधील कंपनी असून या कंपनीचे 100पेक्षा अधिक ग्राहक आहेत. यामधील काही कालावधीपर्यंत जोडले आहेत. कंपनीची 16 देशांमध्ये 30 प्रतिष्ठानांमध्ये 5,000 कंसल्टेंटवर काम करत आहेत. कॅप्कोने 2020 मध्ये य72 कोटी डॉलरची कमाई केली होती.