बेळगाव ः दांडेली बॅडमिंटन संघटना आयोजित विभागीय शटल बॅडमिंटन स्पर्धेत 13 वर्षाखालील मुलांच्या गटात बेळगावच्या प्रितम कानिटकरने उपविजेतेपद मिळवले. अंतिम लढतीत युवराज होसमनीने प्रीतमला पराभूत केले.
दांडेली येथील सुभाषनगर इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित विभागीय निमंत्रितांच्या शटल बॅडमिंटन स्पर्धेत उत्तर कन्नडा, हुबळी, धारवाड, बेळगाव, गदग आदी जिल्हय़ातील बॅडमिंटनपटूंनी भाग घेतला. बेळगावच्या भूषण बॅडमिंटन अकादमीचा खेळाडू प्रितम कानिटकरने पहिल्या फेरीत आदर्शचा 13-9, दुसऱया फेरीत चिरंजीवीचा 30-3, तिसऱया फेरीत आयुषचा 30-12, उपांत्यपूर्व फेरीत कार्तिक एन. चा 30-17, उपांत्य फेरीत तनुषचा 15-9, 15-12 असा पराभव करत अंतिम फेरीत मजल मारली.
अंतिम सामन्यात युवराज होसमनीकडून प्रितमला 9-15, 14-15 अशा सेटमध्ये पराभव पत्करावा लागले. पाहुण्यांच्या हस्ते त्याला उपजेतेपदाचा चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. त्याला बॅडमिंटन प्रशिक्षक भूषण अणवेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.