प्रतिनिधी /बेळगाव
विमल स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित दुसऱया विमल जाधव स्मृती चषक खुल्या कबड्डी व खो खो पुरुष व महिला स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वाजता महाव्दार रोड येथील श्री धर्मवीर संभाजी उद्यान मैदानावर प्रारंभ होणार आहे, अशी माहिती विमल स्पोर्ट्स फौंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी बैठकीत दिली.
विमल फौंडेशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत किरण जाधव, अशोक हलगेकर, एन. आर. पाटील, आर. एल. पाटील, नितीन नाईक, विवेक पाटील, व्ही. एल. हुलजी आदी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेबद्दलची रूपरेषा आखण्यात आली असून, सदर स्पर्धा एक गाव एक संघ मर्यादित असून पुरुष गटातील विजेत्या संघाला रोख 20 हजार व चषक, उपविजेत्या संघाला रोख 15 हजार व चषक, तिसऱया क्रमांकाला रोख 10 हजार चषक, चौथ्या क्रमांकाला 5 हजार चषक, तर महिला गटातील विजेत्या संघाला रोख 10 हजार, उपविजेत्याला 7000, तिसऱया क्रमांकाला 5000, पदक, प्रमाणपत्र तसेच वैयक्तिक बक्षिसे अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट रायडर, उत्कृष्ट कॅचर देण्यात येतील. पुरुष खो-खो स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख 15 हजार, उपविजेत्या संघाला रोख 10 हजार, तिसऱया क्रमांकाला 7 हजार, चौथ्या क्रमांकाला 4 हजार व महिला गटातील विजेत्याला रोख 10 हजार उपविजेत्याला 7 हजार, तिसऱया क्रमांकाला 3 हजार, चौथ्या क्रमांकाला 2 हजार, चषक, पदक, प्रमाणपत्र तर उत्कृष्ट चेझर, उत्कृष्ट रनर, अष्टपैलू खेळाडू, अशी आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक संघानी आपली नावे शुक्रवारी 14 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खो-खो प्रशिक्षक नारायण पाटील कडोली, नितीन नाईक बेळगाव, कबड्डी आरएल पाटील, एव्ही हुलजी, अरुण बोळशेट्टी, उमेश बेळगुंदकर बालिका आदर्श, सी. आर. पाटील संत मीरा शाळा अनगोळ, विवेक पाटील ठळकवाडी शाळा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विमल फौंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी केले आहे.