धावपट्टीपासून एफटीओपर्यंत होणार टॅक : 45 लाखाचा खर्च येणार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या सांबरा विमानतळावर अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. मुख्य धावपट्टीपासून ते फ्लाईंग टेनिंग ऑर्गनायझेशनपर्यंत (एफटीओ) 10.5 मीटरचा टॅक्सी ट्रक बनविण्यात येणार आहे. यासाठी एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडून निविदा मागविण्यात आली आहे. यामुळे लवकरच बेळगावमध्ये दोन एफटीओ सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बेळगाव विमानतळ येथे दोन खासगी फ्लाईंग टेनिंग ऑर्गनायझेशनना परवानगी मिळाली. बांधा-वापरा-हस्तांतरित करा, या तत्त्वांवर याची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे बेळगावमध्ये वैमानिक तयार होणार आहेत. बेळगाव शहराच्या लौकिकात यामुळे भर पडणार आहे. तसेच जिल्हय़ाच्या विकासाला चालना मिळणार आहे. एफटीओमुळे विमानतळावरही सोयी-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. विमानतळाच्या धावपट्टीपासून ते एफटीओपर्यंत टॅक्सी ट्रक करण्यात येणार आहे. यामुळे वाहनांची वाहतूक करणे सोयीचे होणार आहे.
45 लाखांचे कंत्राट
पॉवर हाऊसपासून एफटीओजवळ फिडर पिलर बॉक्सपर्यंत विद्युतवाहिन्या घातल्या जाणार आहेत. यासाठी 45 लाखाचा अंदाजे खर्च आहे. 3 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करावे लागणार आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर याबद्दल अधिक माहिती दिली आहे. निविदा मागविण्यात आल्याने या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.