सुरक्षेच्यादृष्टीने नव्या यंत्रणेचा अवलंब
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विमानतळावर साहित्य तपासणीसाठी अत्याधुनिक तपासणी यंत्रणा बसविण्यात आली आहे. शनिवारपासून या यंत्रणेचा कार्यारंभ करण्यात आला. एक्स रे लगेज इन्स्पेक्शन सिस्टिम ही नवी मशिनरी बसविण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांच्या साहित्याची जलगगतीने तपासणी होणार आहे.
बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱया प्रवाशांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे वेळेत साहित्याची तपासणी होणे गरजेचे आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नवी यंत्रणा बसविणे गरजेचे होते. अखेर शनिवारपासून ही यंत्रणा बसविण्यात आली. यासाठी दोन जनरेटर बसविण्यात आले आहेत. या नव्या यंत्रणेमुळे साहित्याची तपासणी गतीने होणार आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू असल्यास ती त्वरित शोधण्यास मदत होणार आहे.