प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विमानतळावर नाईट पार्किंगसाठी विमाने थांबत आहेत. तसेच दररोज 12 ते 13 फेऱया होत असल्याने मोठय़ा फ्यूअल स्टेशनची आवश्यकता भासत होती. इंडियन ऑईल विमानतळावर 13 हजार स्क्वेअर फूट जागेवर फ्यूअल स्टेशन उभारणार आहे. शुक्रवारी विमानतळ प्रशासन व इंडियन ऑईलच्या अधिकाऱयांमध्ये समन्वय करारावर सहय़ा करण्यात आल्या.
विमानतळावर यापूर्वी एचपीसीएल कंपनीचे फ्यूअल स्टेशन होते. विमानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आणखी एका फ्यूअल स्टेशनची आवश्यकता भासत होती. इंडियन ऑईलने फ्यूअल स्टेशन सुरू करण्यास सहमती दर्शविल्याने पुढील 3 वर्षांसाठी समन्वय करार करण्यात आला. यावेळी बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य, हेमंत राठोड, विजय नाईक, पी. एस. देसाई यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
विमानांसोबत फ्लाईंग स्कूलला होणार मदत
केवळ विमानांसाठीच नव्हे तर बेळगाव विमानतळावर होणाऱया दोन फ्लाईंग स्कूलसाठी फ्यूअल स्टेशन महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे इंधनासाठी इतर शहरांवर अवलंबून रहावे लागणार नाही. भविष्यात विमानांची संख्या आणखी वाढण्याची शक्मयता असल्याने इंधनाच्या मागणीत वाढ होणार आहे.