प्रतिनिधी/ पेडणे
मोप येथील तेराव्या आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड मोपा विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटनाचा कार्यक्रमा पाहण्यासाठी अनेक नागरिक उत्सुक होते. क्षमतेपेक्षा जास्त नागरिक सभागृहामध्ये उपस्थित होते. त्यामुळे आसन व्यवस्था नसल्याच्या कारणामुळे दूरूवरून आलेल्या अनेक हजारो नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे नागरिकांना नाराज होऊन माघारी फिरावे लागले. त्यात पेडणे तालुक्मयातील अनेक जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, पंच, तसेच प्रति÷ित नागरिकांचाही समावेश होता.
पेडणे तालुक्मयातील आणि पर्यायाने उत्तर गोव्यातील नागरिकांचे मोप विमानतळ एक स्वप्न होते. तसेच विमानतळाच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर येणार आणि त्यांना पाहण्याची संधी आम्हाला मिळणार यासाठी अनेक नागरिक उत्सुक होते. यासाठी आपापल्या आमदाराकडू पास घेऊन आले होते. हे पास घेऊन येताना काहीजण उशिरा आल्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला नाही. तर काही ना आसन व्यवस्था नसल्यामुळे माघारी फिरावे लागले. अशा अवस्थेत हजारो नागरिक माघारी फिरत असल्याचे चित्र मोपा विमानतळ परिसरातील दोन्ही गेटवरून दिसून येत होते. याबाबत काहीजणांनी पत्रकारांसमोर नारजी व्यक्त केली.
आम्हाला खास या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी बोलावण्यात आले होते. आम्हाला निमंत्रणसुद्धा होते. आम्ही थोडय़ा वेळाने आपली वाहने घेऊन या विमानतळ परिसरात पोचलो, परंतु आम्हाला प्रवेश दिला नाही. यामुळे आमचे कार्यकर्तेही नाराज झाले, अशी प्रतिक्रिया मांद्रे उपसरपंच तारा हडफडकर यांनी दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकण्याची आणि कार्यक्रम पाहण्याची इच्छा होती. त्यासाठी आम्ही हळदोणा आलो होतो. परंतु ती पूर्ण झाली झाली नाही, कारण मोपा विमानतळ होत असल्याने एका बाजूने आनंद असल्याची प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने दिली.
आमच्याकडे पास होता. परंतु आम्हाला प्रवेश दिला नाही. जिथे स्थानिक पत्रकारांना प्रवेश दिला नाही. तिथे आम्हाला तरी प्रवेश कसा मिळेल, असा सवाल किरण शेटय़े केला. सभागृहाची क्षमता नसताना लोकांना मोठय़ा संख्येने बोलावून सरकारने आपले हसे करून घेतले, असेही ते म्हणाले.