नवी दिल्ली
विमानाच्या इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. एटीएफ इंधनाच्या दरात नुकतीच प्रति किलोलिटरमागे 6 हजार 188 रुपयांची वाढ करण्यात आली असून यंदा 10 व्यांदा दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जाते. ही वाढ 5.3 टक्के इतकी नोंदली गेली आहे. राष्ट्रीय राजधानीत आता वाढीनंतर विमान इंधनाचे दर 1 लाख 23 हजार 039 रुपये प्रति किलोलिटर इतके झाले आहेत.