ऑनलाईन टीम / डेन्व्हर :
डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होनोलुलूला जाण्यासाठी उड्डाण केलेल्या युनायटेड एअरलाईन्सच्या बोईंग ७७७ विमानाच्या इंजिनने अवघ्या काही मिनिटातच पेट घेतला. पायलटने तत्परता दाखवत अवघ्या 20 मिनिटात विमानाचे पुन्हा डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग केले. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने यासंदर्भात माहिती दिली असून, विमानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
या विमानाने डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानाच्या इंजिनने पेट घेतला. या विमानात १० क्रू मेंबर्स आणि २३१ प्रवाशी प्रवास करत होते. पायलटच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशी थोडक्यात बचावले.