बेंगळूरः-
विमान क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेटने आपल्या प्रवाशांसाठी एक नवी योजना नुकतीच सुरू केली आहे. याअंतर्गत विमानातील प्रवाशांना विमानतळावर उतरल्यावर टॅक्सीसाठी ताटकळत थांबावे लागणार नाही. विमान प्रवाशांना प्रवासातच आगाऊ टॅक्सी बुक करता येणार आहे. सदरच्या टॅक्सी सुविधेसाठी प्रवाशांना स्पाइसजेटच्या स्पाइसस्क्रीन प्लॅटफॉर्मचा वापर मात्र करावा लागणार आहे. या सेवेची सुरूवात दिल्ली विमानतळावर केली जाणार असून यानंतर टप्प्याटप्प्याने ही सेवा मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, गोवा, चेन्नई, पुणे व इतर शहरांमध्ये दिली जाणार आहे.