विमान प्रवासात प्रवाशांनी ताळतंत्र सोडून अत्यंत बेजबाबदार वर्तणूक केल्याचे प्रकार अलीकडच्या काळात अनेकदा घडत आहेत. विमानात आता सुरक्षारक्षक किंवा बाउन्सर्स नियुक्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे काय? असे वाटावे अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे हे प्रताप करणारी माणसे बिझनेस क्लासमधील म्हणजेच श्रीमंत असतात. त्यामानाने इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करणारे प्रवासी बरेच सभ्यतेने वागणारे असतात, असेही दिसून आले आहे.
एका रशियन महिलेने तर कमालच केली आहे. बिझनेस क्लासमधून प्रवास करताना तिने विमानात 2 ते 3 सिगारेटी ओढल्या आणि नंतर तिला कसली तरी नशा चढली आणि तिने कॉकपीटमध्ये प्रवेश करण्याचा हट्ट धरला. विमानातील कर्मचाऱयांनी तिला बरेच समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने मानले नाही. कॉकपीटमध्ये जाण्यास प्रतिबंध करण्यात आल्यावर तिने राडा सुरू केला. अंगावरचे सर्व कपडे उतरवून ती विमानभर फिरून आली. त्यामुळे इतर प्रवाशांची भीतीने तारांबळ उडाली. या महिलेच्या डोक्मयावर परिणाम झालेला आहे की काय? आणि अशा महिलेला विमानात घेतले तरी कसे? असा प्रश्न जो तो विचारू लागला. तिला आवरणे विमान कर्मचाऱयांना अक्षरशः अशक्मय होत होते.
ती महिला असल्याने तिच्यावर बळाचा वापर करून तिला नियंत्रणात आणणेही अशक्य होते. अखेरीस काही कर्मचाऱयांनी धाडस दाखवून तिला एका खुर्चीला बांधले. त्यानंतर तिने शिवीगाळ करून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना स्टावरोपोलपासून रशियाची राजधानी मॉस्को येथे जाणाऱया विमानातील आहे. आपल्याला रुग्णालयात पाठवा, कारागृहात पाठवा किंवा वेडय़ांच्या रुग्णालयात पाठवा, पण एकदा तरी कॉकपीटमध्ये जाऊ द्या, हा धोशा तिने कायम ठेवला. अखेरीस कॉकपीटमधून एक तार आणून तिला तारेच्या साहाय्याने बांधून ठेवण्यात आले. काही वेळाने ती तारही तोडून पुन्हा मोकळी फिरू लागली. एका रशियन वृत्तवाहिनीने या घटनेचा क्हिडिओ शेअर केला आहे. असा प्रकार जगात यापूर्वी घडल्याची नोंद नाही, अशीही टिप्पणी केली आहे. सध्याच्या काळात अशा बेजबाबदार वागण्याची समस्या विमानप्रवासात वाढत असून त्यावर कठोर उपाय करण्याची आवश्यकता अनेक विमान कंपन्यांनी व्यक्त केली आहे. आपली प्रवाशांची संख्या कमी होऊ नये म्हणून विमान कंपन्या कित्येकदा अशी वर्तणूक खपवून घेतात किंवा बोटचेपे धोरण अवलंबतात. आता सर्व विमा कंपन्यांनी एकत्र येऊन यावर काही उपाय शोधण्याची वेळ आलेली आहे, असे तज्ञांचे मत आहे.