ऑनलाईन टीम / काबुल :
अमेरिकन लष्कराच्या विमानाला लटकून देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या अपघातात अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय फुटबॉलपटूचा दुर्देवी मृत्यू झाला. झाकि अनवारी वय 19 असे या फुटबॉलपटूचे नाव आहे. अफगाणिस्तानमधील फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स विभागाच्या जनरल डारेक्टरेटने यासंदर्भात माहिती दिली आहे.
तालिबान्यांनी सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानातील नागरिकांनी देशाबाहेर पडण्यासाठी सोमवारपासून काबुल विमानतळावर गर्दी केली आहे. काबुलमध्ये विमानात बसण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे. झाकि अनवारी हा अमेरिकन लष्कराच्या विमानाच्या चाकाला लटकून देशाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी झालेल्या अपघातात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. झाकि अनवारी हा इस्तेकलाल या अफगाणिस्तानमधील सर्वात नावालेल्या शाळेत शिकत होता.
दरम्यान, मंगळवारीही अमेरिकन हवाई दलाच्या सी 17 विमानाच्या चाकांमध्ये मानवी अवशेष आढळून आले आहेत.