वृत्तसंस्था/ पॅरीस
डब्ल्यूटीएतर्फे 2021 च्या टेनिस हंगामातील होणाऱया महिला टूरवरील विविध स्पर्धांचे प्राथमिक स्वरूपाचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. येत्या जून-जुलै दरम्यान लंडनमध्ये होणाऱया विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेपर्यंत हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
डब्ल्यूटीए महिलांच्या टूरवरील टेनिस स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या नव्या वर्षांच्या टेनिस हंगामातील डब्ल्यूटीए-500 दर्जाची पहिली महिलांची टेनिस स्पर्धा अबु धाबीत गुरूवारपासून सुरू झाली आहे. या वेळापत्रकानुसार ऑस्ट्रेलियात ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा 8 फेब्ा्रgवारीपासून, पेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा 23 मे पासून आणि विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा 28 जूनपासून सुरू होणार आहे. नव्या वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांच्या कालावधीत डब्ल्यूटीए 1000 च्या चार स्पर्धा होणार आहेत. दुबई आणि मियामी येथे या दोन स्पर्धा मार्च महिन्यात, माद्रीदमधील स्पर्धा एप्रिल महिन्यात तर रोममधील स्पर्धा मे महिन्यात होणार आहे. डब्ल्यूटीए टूरवरील 500 दर्जाच्या महिलांच्या स्पर्धा डोहा आणि सेंट पीटर्सबर्ग येथे मार्चमध्ये, चार्लस्टन आणि स्टूटगार्ट येथील स्पर्धा एप्रिल महिन्यात त्याचप्रमाणे पूर्वाश्रमीची फेडरेशन चषक तर नव्याने नामकरण करण्यात आलेली बिली जिन किंग चषक महिलांची स्पर्धा 12 एप्रिलपासून घेतली जाणार आहे.