बेंगळूर
आगामी होणाऱया आशियाई क्रीडास्पर्धेत भारताचे गोल्फपटू विराज मदाप्पा, रशीद खान आणि महिला विभागात अवनी प्रशांत यांनी आपले तिकीट आरक्षित केले.
आगामी आशियाई स्पर्धेसाठी येथे पात्र फेरीची गोल्फ स्पर्धा घेण्यात आली. पुरूषांच्या विभागात विराज मेदाप्पाने पाच फेऱयामध्ये 66-68-71-69-67 गुण नोंदविताना एकूण 18-अंडर 270 सरासरी गुण मिळविले. रशीद खानने पाच फेऱयांमध्ये 16 अंडर 272 सरासरी गुण नोंदवीत दुसरे स्थान मिळविले.
महिलांच्या विभागात हौशी गोल्फपटू अवनी प्रशांतने चार फेऱयामध्ये 14-अंडर 274 सरासरी गुण नोंदवित आशियाई स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. या पात्र फेरीच्या गोल्फ स्पर्धेत पुरूष विभागात 16 गोल्फपटू तर महिला विभागात 11 गोल्फपटू सहभागी झाले होते. पुरूष विभागातून दोन तर महिला विभागातून एका गोल्फपटूंची आशियाई स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. आगामी आशियाई क्रीडास्पर्धा चीनमधील हँग्झू शहरामध्ये 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान घेतली जाणार आहे.