वृत्तसंस्था/ सिडनी
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी भारतीय नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या असून फटाके न फोडण्याचा सल्लाही दिला आहे. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला असून कोहलीचे वास्तव्य सिडनीमध्ये आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून भारतीय संघाने या मालिकेसाठी जोरदार सराव सुरू केला आहे. कोरोना महामारी समस्येमुळे भारतीय नागरिकांना कोहलीने सावधगिरी बाळगण्याचा संदेश दिला असून दीपावलीचा आनंद लुटताना शक्मयतो फटाके फोडू नयेत, असे सांगितले आहे.
गर्दीमध्ये न जाता आपल्या घरीच राहून या सणाचा आनंद उपभोगावा, अशा शब्दात भारतीय कर्णधाराने आपल्या असंख्य चाहत्यांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. फटाक्मयांमुळे प्रदूषणाला अधिक वाव मिळतो आणि बऱयाच लोकांच्या प्रकृतीवरही त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. दीप प्रज्वलित करून मिठाईचा स्वाद घेत आपल्या घरीच दीपावली आपल्या कुटुंबीयांसमवेत साजरी करावी, अशी विनंती त्याने कली आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने देशाचे संरक्षण करणाऱया सरहद्दीवरील सर्व जवानांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण तसेच वीरेंद्र सेहवाग, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांनीही इन्स्टाग्रॅमवरुन भारतीय नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.