भाजपची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/ पणजी
सरकारमधून बाहेर पडलेले माजी मंत्री तसेच काँग्रेसच्या आमदारांनी भाजप सरकारला घेरण्यासाठी जी महाआघाडी केली आहे त्याचा विरोधात आता भाजप लढणार आहे. या सर्व मंत्र्याचे आम्ही घोटाळे बाहेर काढणार आहे. यात सहभागी असलेले माजी मंत्री रोहन खवटे यांचा घोटाळा आम्ही जनतेसमोर आणला आहे. मुख्यंमत्र्यांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहे, असे भाजपचे प्रेमानंद म्हांबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
माजी मंत्री व सध्याचे पर्वरीचे अपक्ष आमदार हे 2012 मध्ये 14 कंपन्यांचे मालक व भागीदार होते 2017 मध्ये त्यात 4 कंपन्यांची भर पडली आहे. सध्या ते 18 कंपन्यांचे मालक तसेच भागीदार म्हणून काम करत आहे. या कंपन्याची जास्ती जास्त कार्यालये ही पणजीत आहे. ही कार्यालये स्थानिक जागेत आहे त्यामुळे त्याचा मनपाला फक्त 500 रुपये कर दिला जातो. त्याच्याकडून व्यवसायिक कर भरला जात नाही, असा आरोप म्हांबरे यांनी केला.
तसेच रोहन खवटे यांचे पर्वरी तर कार्यालय हे स्थानिक कोमुनिदाद जागेत बांधण्यात आले आहे. तसेच त्याचा करझाळे येथे फ्लेट आहे त्याची नोंदणी पणजी मनपाकडे sनाही आहे. तसेच पणजीत हॉटेल आहे त्याच योग्य कर भरला जाता नाही त्यांचे अनेक गैर धंदे आहेत. यात त्याचा भावाचा समावेश आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्याकडे करणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे महानंद अस्नोडकर, गुरुप्रसाद पाऊसकर व कुंदा चोडणकर उपस्थित होत्या.