ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आदरांजली वाहिली जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त दोन ट्विट केले आहेत.
आपल्या एका ट्विटमधून बाळासाहेबांना आदरांजली वाहणारा व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे. फडणवीसांच्या आवाजातच हा व्हिडिओ आहे. त्याद्वारे फडणवीसांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या आहेत. कठोर अन् प्रेमळ… प्रेरणादायी अन् ऊर्जावान… असं त्यांनी बाळासाहेबांचं वर्णन केलं आहे. त्यांचे विचार सदैव मार्गदर्शन करत राहतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
तर दुसऱया ट्विटमध्ये ‘महाराष्ट्राचं वैभव, ज्वलंत विचारांचा ‘मार्मिक’ ठेवा, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन…!’ असं कॅप्शन देत एक फोटो शेअर केला आहे. या दोन्हीं ट्विटची सर्वत्र चर्चा आहे.