नवारस्ता / प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवार दि. २८ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील कोयना दौऱ्यावर आले मात्र मोरगिरी येथे आंबेघरच्या दुर्घटनेला भेट दिल्यानंतर त्यांनी पुरग्रस्तांच्या समवेत पंगतीत जेवण केले.
सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयना दौऱ्यावर येणार होते. मात्र खराब हवामाना मुळे दुर्घटनाग्रस्त आंबेघरची हवाई पाहणी करून मुख्यमंत्र्यांचा कोयना दौरा रद्द झाला.
मात्र दोन च दिवसानंतर म्हणजे आज बुधवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ही कोयना दौरा झाला.या दौऱ्यात फडणवीस यांनी मोरगिरी विभागातील दुर्घटनाग्रस्त आंबेघर ची पाहणी केली आणि पुरग्रस्तांच्या समवेत चक्क पंगतीत जेवण ही केले. यावेळी त्यांनी आपतग्रस्तांना भरीव मदत जारण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या समवेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आ जयकुमार गोरे,नरेंद्र पाटील,अतुल भोसले होते.