डिचोली/प्रतिनिधी
साखळी नगरपालिका क्षेत्रातील विर्डी या गावात रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढतच आहे. काल बुधवारी (दि. 8) विर्डी गावात 5 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या गावातीलच रूग्णांची संख्या 11 झाली आहे. साखळी नगरपालिका तसेच इतर ग्रामीण भागात बुधवारी एकही कोरोना रूग्ण आढळून आला नाही. ती एक दिलासादायक बाब आहे. या पाच रूग्णांमुळे डिचोली तालुक्मयातील एकूण रूग्णांची संख्या 64 झाली आहे.
साखळी नगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याने सर्वत्र खबरदारीची उपाय हाती घेण्यात येत आहेत. तरीही संसर्ग वाढतच असल्याने रूग्ण आढळून येतच आहे. सरकारने कोरोना संसंर्गाचा फैलाव जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी कडक पावले उचलण्याची जरी सुचना केली असली तरी लोकांमध्ये या आजाराची धास्ती आहे पण बेफिकीरपणाही असल्याचे जाणवत आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या रूग्णांपैकी काहींनी आपल्याला जाणवत असलेल्या या व्हायरसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे या व्हायरसचा संसंर्ग अनेक ठिकाणी झाला आहे, असे आढळून आले आहे.
विर्डी या गावात सर्वप्रथम चार रूग्ण सकारात्मक आढळून आले होते. त्यानंतर मंगळ. दि. 7 रोजी दोन सकारात्मक रूग्ण आढळून आले. तर काल बुध. दि. 8 रोजी थेट पाच सकारात्मक रूग्ण आढळल्याने गावातील वातावरण भयावह झालेले आहे. लोकांनी या संसंर्गाचा धसका घेतलेला असून विर्डी गावातील रूग्ण आढळलेले भाग सील करण्याची मागणी केली जात आहे. त्याकडे सरकारने गांभिर्याने लक्ष देताना गावातील कोरोनाचा संसंर्ग रोखण्यास पावले उचलावीत, अशी मागणी गावातील ग्रामस्थ व नगरसेवक राजेश सावळ यां?नी केली आहे.
सोमवारी सर्वप्रथम चार रूग्ण आढळून आल्यानंतर या गावातील लोकांची साखळीतील सयकारी सामाजिक आरोग्य केंद्रात स्वेब टेस्ट करण्यात येत होत्या. त्यामुळे विर्डी गावातील लोकांना साखळीत यावे लागत होते. मात्र सदर स्वेब टेस्ट विर्डी गावातच व्हाव्यात अशी मागणी लोकांकडून झाल्यानंतर नगरसेवक राजेश सावळ यांनीही सरकारदरबारी केलेल्या प्रयत्नां?अंती सदर स्वेब टेस्टची व्यवस्था विर्डी गावातील महादेव मंदिराच्या परिसरात करण्यात आली. त्यामुळे लोकांवर खास साखळीत जाण्याची परिस्थिती ओढावली नाही. काल बुध. दि. 8 रोजी विर्डी गावातील 100 जणांच्या स्वेब टेस्ट घेण्यात आल्या आहेत. त्यांचे अहवाल आज गुरू. दि. 9 रोजी मिळण्याची शक्मयता आहे.
डिचोली सामाजिक आरोग्य कें?द्राच्या आखत्यारीत येणाऱया भागातून काल बुध. लि. 8 रोजी एकही सकारात्मक रूग्णाची नोंद झालेली नाही. त्यामुळे डिचोली भागातील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच साळ गावातील चारही रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने या गावतील सील करण्यात आलेला मधलावाडा खुला करण्यात येणार असल्याचे समजते. तसेच गावठण साखळी येथील कोरोनाबाधीत रूग्ण बरे झाल्याने तेथीलही मायक्रो कंटेनमेंट झोन हटविण्यात येणार असल्याचे समजते.