प्रतिनिधी/ सातारा
विर धरण परिसरात अज्ञात व्यक्तीची मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमसारास मृतदेह पाण्यात तरंगत असताना अढळल्याने हि घटना उघडकीस आली. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील विर धरण परीसरात पाण्यात तरंगत असताना अदाजे 40 वय असलेल्या पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती सोमवारी 11.30 वाजण्याच्या सुमसारास शिरवळ पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची पहाणी केली असता मृतदेहाच्या चेहऱयावर व कपाळावर तसेच डोक्यात गंभीर जखमा अढळल्या. या जखमांवरुन त्या इसमास दगडाने ठेचून मारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
दरम्यान, पाण्यात मृतदेह तरंगत असल्याची बातमी समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेहाच्या चेहऱयावर गंभीर जखमा असल्याने घातपाताचा संशय वर्तविला जात आहे. त्यामुळे परिसरात एकच चर्चा सुरु झाली. मृतदेह अज्ञात असल्याने परिसरात चौकशीची कामे वेगाने सुरु झाली परंतू उशिरापर्यंत ओळख पटली नाही.