प्रतिनिधी / बांदा:
बांदा – दाणोली मार्गावरील विलवडे खांबदेव मंदिरजवळ कोल्हापरहून म्हापसा-गोवा येथे कोंबडय़ांची वाहतूक करणारा टेम्पो शनिवारी पहाटे अपघातग्रस्त झाला. यामध्ये गाडी गटाराबाहेर जाऊन उभी राहिल्याने चालक व क्लीनर दोघेजण बालबाल वाचले. हा अपघात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झाला. ररस्त्यावर धुके असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो रस्त्यालगत गटारात जाऊन कोसळला. सुदैवाने या अपघातात मोठा अनर्थ टळला. याबाबतची नोंद बांदा पोलिसात नव्हती. अपघातानंतर दुपारी कोंबडी दुसऱया गाडीतून बाहेर काढण्यात आली तर स्थानिकांनी मदत कार्यात भाग घेऊन टेम्पो बाहेर काढला. सायंकाळी उशिरापर्यंत अपघाताची नोंद बांदा पोलिसांत करण्यात आलेली नव्हती.