प्रतिनिधी/ सातारा
सहकारमहर्षी माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे पार्थिव सातारा येथे अंत्यदर्शनासाठी त्यांच्या गोडोली येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. सकाळपासून त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विलासकाका उंडाळकर यांच्या चाहत्यांनी व राजकीय धुरिणांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
सातारा जिह्यातील काँग्रेसचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे विलासकाका उंडाळकर यांचे पहाटे निधन झाल्याचे समजताच जिह्यात राजकीय न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली. जिह्यातील राजकीय पुढाऱयांचे पाऊले आपोआप तिकडे वळली होती. दरम्यान, काकांच्या अंत्यदर्शनासाठी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी गर्दी झाली होती. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावली होती.