कराड / प्रतिनिधी :
माजी सहकार मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर (वय 84) याचे आज पहाटे निधन झाले. कराड तालुक्यातील उंडाळे येथे आज (सोमवार) दुपारी 3 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सकाळी 9. 30 वाजता त्यांचे पार्थिव सातारा येथील निवासस्थानातून कराडला आणण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता कराड शेती उत्पन्न बाजार समिती येथे अंतिम दर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. 12.30 ला कराड येथून उंडाळेकडे रवाना होणार असून दुपारी 2 वाजता उंडाळे येथे अंतिम दर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता उंडाळे येथे अंत्यविधी होणार आहे.