बेळगाव
सामाजिक कार्यकर्ते संजय किल्लेकर दांपत्याने आपला 21 वा विवाह वाढदिवस कोरोनाशी मुकाबला करीत असलेल्या कार्यकर्त्यांशी नुकताच साजरा केला. कलमठ रोड येथील शववाहिका कार्यालयातील जे वाहक, चालक व यासंबंधी जे इतर लोक आहेत त्यांना जेवण, गरजू वस्तू भेट देऊन त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करून त्यांचा आशिर्वाद घेतला. अशा प्रकारे संजय किल्लेकर यांनी विवाहाचा वाढदिनी समाजाच्या मतदीप्रीत्यर्थ खारीचा वाटा उचलला