जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरु, बादें-कायसुव भागातील घटना
म्हापसा . (प्रतिनिधी)
देव देवतांच्या साक्षीने शनिवारी दुपारी लग्नाची गांठ बांधुन जन्मोजन्मीचा साथ देण्याचे वचन देत नवरदेवाच्या घरात सिमा गौरेश चोडणकर या तरुण नववधुने अंगावरील हळदीचा रंग उतरण्याआधीच रविवारी पहाटे घरच्या बाथरूममध्ये गळफास घेत आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रकार बार्देशातील बादें-कायसुव याभागात घडला. या घटनेने गौरेश चोडणकर यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झाला.
या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजुं शकले नाही. हणजुण पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह बांबोळीच्या गोवा वैद्यकीय इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठवुन दिला आहे. दरम्यान, मुळ, घोगळ – मडगांव ( सासष्टी ) येथील रहिवासी गुरुनाथ नाईक यांच्या कन्या असलेल्या सिमाचा विवाह शनिवारी दुपारी बादें-कायसुव येथील गौरीश चोडणकर यांच्याशी थाटामाटात, सगे सोयरे तसेच देव देवतांच्या मंत्रोच्चारात झाला होता. संध्याकाळी, सहा ते साडेसहाच्या दरम्यान नववधुचे वाजत गाजत बादें येथील गौरेश चोडणकर यांच्या घरात उत्साहात आगमन झाले होते.
दरम्यान, नव दांम्पत्याकडून घरचे धार्मीक विधी आटोपल्यानंतर रात्रीचे जेवण घेतल्यानंतर नववधू सिमा आपल्या सहकारी तरुणी (धेडी ) तसेच अन्य महिलांच्या सोबतीने रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास झोपी गेल्या होत्या. दरम्यान, रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास इतरांचा डोळा चुकवून नववधू सिमा चोडणकर या लघुशंकेच्या निमित्ताने अलगद घरच्या बाथरुममध्ये गेल्या असतां तेथील खिडकीच्या लोखंडी पट्टीला अंगावरील दुपट्टय़ाच्या सहाय्याने गळफास घेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.
दरम्यान, घरात एकुण सहा बहिणीपैकी एक असलेल्या सिमाने अंगावरील हळदीचे रंग उतरण्याआधीच नवरदेवाच्या घरी अशा प्रकारे आपली जीवनयात्रा संपविण्यामागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातच अडकून पडले आहे मात्र या अघटीत घटनेने शांत , सुस्वभावी गौरीशच्या जीवनात फार मोठा आघात झाला आहे. घरांतील मोठा मुलगा असलेल्या गौरीशला एक भाऊ आणी एक विवाहीत बहिण आहे. वडील विठ्ठल चोडणकर तसेच मोठय़ा विवाहित बहिणीचा याआधीच म्रुत्यू झाला आहे. दरम्यान, गौरिशचा दुसऱया नंबरचा अविवाहित भाऊ रविवारी सकाळी परिसरात जॉगींगकरून घरी परततेवळी आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. हणजुण पोलिसांना घटनेची माहिती देतांच उप-निरीक्षक महेश केरकर तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेघा पंचनामा केला, पोलिसांकडून म्रुत सिमा चोडणकरचा म्रुतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीच्या गोमेकॉत पाठवून दिला आहे. सोमवारी सकाळी म्रुतदेहाची शिकीत्सा होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होत असल्याने लग्नाच्या दुसर्याच दिवशी गौरीश चोडणकर व कुटुंबीयांवर यासंबंधात चौकशीच्या फेऱयाना सामोरे जाण्याची वेळ आली होती.