प्रतिनिधी / सातारा :
एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला सतत उपाशीपोटी ठेवून दारुच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी तिच्या पतीवर तसेच तिचा शारीरीक, मानसिक छळ केल्याप्रकरणी सासू, सासरे, दीर अशा चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार मधुरा मनोज माने (वय 41, सध्या रा. देवी कॉलनी, सदरबझार, सातारा, मूळ रा. ब्राम्हणवाडी, तासगाव, ता. सातारा) यांचा विवाह मनोज मधुकर माने (रा. ब्राम्हणवाडी, तासगाव, ता. सातारा) यांच्याशी झाला होता. सन 2008 ते 16 सप्टेंबर 2021 या कालावधीत मधुराला यांना पतीने शाररीक, मानसिक त्रास दिला. तसेच दारुच्या नशेत मुलींना शिवीगाळ, मारहाण करत होते. पती मनोज वारंवार त्यांच्या चारित्र्यावर संशय घेवून मारहाण करत होता तर सासू प्रभावती मधुकर माने त्यांना उपाशी पोटी ठेवत होत्या. पती व सासूसह सासरे मधुकर भिकाजी माने व दीड शैलेश मधुकर माने (रा. ब्राम्हणवाडी, तासगाव, ता. कोरेगाव) हे चौघेही घालून पाडून बोलून त्रास देत होते तर पतीच्या मारहाणीला कंटाळून दि. 10 रोजी मधुरा यांनी शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करत आहेत.