वारंवार शिवीगाळ, मारहाण : दागिनेही काढून घेतले : घरातून हाकलून दिल्याची तक्रार
प्रतिनिधी /सातारा
पुण्यातील भोसले पार्क, हडपसर मगरपट्टा येथे रहात असताना एका विवाहितेच मारहाण करुन तिला मुलांसह घराबाहेर हाकलून देत तिचे दागिने काढून घेतल्याप्रकरणी तिचा पती, दोन दीर व चुलत सासऱयावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिल्पा गिरीराज शेळके (वय 32, रा. कोडोली, ता. सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2019 साली तक्रारदार विवाहितेचा पती त्याची बंगलोरची नोकरी सोडून तिच्याकडे पुण्यात रहायला आला. तिच्याकडे तीन महिने राहिल्यानंतर तो सातत्याने तिला व तिच्या आईवडिलांना शिव्या देत विवाहितेला मारहाण करत होता. तसेच ती ज्या ठिकाणी नोकरी करत होती तिथे जावून शिवीगाळही करत होता. एकदा त्याने तिला मुलासह घरातून हाकलून दिल्याने ती साताऱयात गोडोली येथे माहेरी राहू लागली.
जुलै महिन्यात ती पुन्हा पुण्याला गेल्यानंतर पती गिरीराज, त्याचे चुलते मानसिंग शेळके व तिचे दोन दीर नागराज व रविराज शेळके तिच्या घरात आले. त्यांनी तिला शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली व मंगळसुत्र, राणीहार, चैन, पैसे, चांदीचा गणपती, वाहनाची कागदपत्रे घेवून गेले. त्यानंतर पती गिरीराज याने विवाहितेच्या भावाला फोन करुन त्याने दुसरे लग्न केले असल्याचे सांगितले. अशा प्रकारे 2015 ते 10 सप्टेंबर 2021 पर्यंत तिचा शारीरीक, मानसिक छळ करुन त्रास देणाऱया पती गिरीराज चंद्रकांत शेळके, (रा. खिंडवाडी, ता. सातारा) व चुलत सासरा मानसिंग साळुंखे, दीर नागराज शेळके, रविराज शेळके यांच्या विरुध्द तक्रारीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप याप्रकरणी कोणास अटक करण्यात आलेली नसून या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करत आहेत.