प्रतिनिधी/ वाई
वाई तालुक्यातील एका गावातील महिलेला बोलवून नेऊन तिची इच्छा नसताना तिच्या इच्छे विरुद्ध दि.15मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता तिच्यावर बलात्कार करणाया रेणावळे (ता. वाई) येथील नारायण यशवंत कोंढाळकर(वय 38) याच्या वाई पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यास शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई तालुक्यातील एका गावातील 22 वर्षीय महिलेने दि.24रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार तिला काही कारणाने बोलवून घेऊन तिच्या इच्छे विरुद्ध नारायण कोंढाळकर याने बलात्कार केला. त्याची माहिती जर कोणाला दिलीस तर तुला व तुझ्या नव्रयाला मारून टाकेन अशी धमकी दिली. याबाबत नारायण कोंढाळकर याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी संशयित आरोपीस अटक करण्याच्या सूचना तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार यांना दिल्या. त्यांनी त्यास शुक्रवारी सकाळी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.