प्रतिनिधी/ सातारा
सन 2003 ते 2020 या कालावधीत एका विवाहितेचा घरगुती कारणातून तसेच चारित्र्याचा संशय घेवून तिचा शारीरीक, मानसिक छळ करुन तिला मारहाण केल्याप्रकरणी पतीसह नऊजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्मिता किरण शिंदे (वय 37, सध्या रा. मालगाव, ता. सातारा, मूळ रा. गोंदवले बुद्रूक, ता. माण) हिने तक्रार दिली आहे. 2003 सालात लग्न झाल्यापासून ते आजमितीपर्यंत तिचा घरगुती कारणातून तसेच चारित्र्याचा संशय घेवून पती किरण भाऊसाहेब शिंदे, ताई भाऊसाहेब शिंदे दोघे (रा. गोंदवले बुद्रूक, ता. माण), स्वाती मानसिंग बनसोडे, मानसिंग बनसोडे (रा. नरवणे, ता. माण, स्नेहल पवन जाधव (रा. कटापूर, ता. कोरेगाव), धनश्री प्रशांत येवले (रा. कोरेगाव, तेजस्विनी योगेश रणपिसे), योगेश रणपिसे (रा. गोंदवले बुद्रूक), व प्राची अरविंद झेंडे (रा. गुरसाळे, ता. खटाव) यांनी शारीरीक, मानसिक छळ केला.
तसेच तिचा पती किरण शिंदे याने दारुच्या नशेत वारंवार गोंदवले, मालगाव, ओगलेवाडी तसेच कल्याण येथे राहताना तिला मारहाण, दमदाटी, शिवीगाळ केली असल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणाला अटक केलेली नाही. या गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.