मराठी विद्यानिकेतन
येथील मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण कमल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत गाऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली. शाळेच्या संगीत विभागातर्फे देशभक्तीपर गीते सादर करून देशाप्रती अभिमान जागृत केला. विद्यार्थ्यांनी मराठी, कन्नड तसेच इंग्रजी भाषेतून आपली मनोगते व्यक्त केली.
कमल हलगेकर यांनी संविधान, कलमे, कर्तव्य, जबाबदाऱया आणि देशाच्या प्रगतीसाठी युवकांची भूमिका याबद्दल सविस्तर विवेचन केले. यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक इंद्रजित मोरे, गजानन सावंत, तसेच प्रसाद सावंत, सीमा कंग्राळकर, बी. एम. पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन शिल्पा सूर्यवंशी यांनी केले.
दिलीप दामले हायस्कूलमध्ये प्रजासत्ताकदिन साजरा
अनगोळ येथील दिलीप दामले हायस्कूल येथे 72 वा प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. निवृत्त सैनिक विनोद मुकुंद शिंदोळकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी. आर. दोडमनी होते.
प्रास्ताविक व स्वागत आर. पी. पाटील यांनी केले. यावेळी एस. एस. बेळगावकर, बी. आर. दोडमनी यांनी प्रजासत्ताकदिनाबद्दल आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी पी. जी. पाटील, पी. एन. देसाई, मनोहर सायनाक आदी उपस्थित होते. पीई शिक्षक एच. बी. पाटील यांनी आभार मानले.
बसवणकुडची
बसवणकुडची येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी चेअरमन रामा दळवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अभियंते सुमित काकडे, ऍड.वाय.के.दिवटे, सुनिल अनगोळकर होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
प्रास्ताविक स्वागत शाळेचे मुख्याध्यापक पी.एम.पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक तसेच मान्यवर सुमित काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेला 5 हजार रुपयांची देणगी दिली. र्काक्रमाला एस.डी.एम.सी सदस्य, पालक उपसिथत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल देसूरकर यांनी केले. तर आभार एम.पी.काकतकर यांनी मानले.
सागर महाविद्यालय…
येथील सागर शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयात (बी.एड.) 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉ. एस. व्ही. गद्दीहलिशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राचार्य आर. व्ही. हळब यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
चैतन्या तिप्पाण्णाचे यांनी स्वागत केले. संगीत प्रा. व्ही. एम. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थींनी देशभक्तीपर गीते सादर केली. स्टेफी डायस हिने वैयक्तिक गीत सादर केले. डॉ. गद्दीहलिशेट्टी यांचे समयोचित भाषण झाले.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. आर. व्ही. हळब यांनी लोकशाहीचे पर्व आणि संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन याबाबत मत व्यक्त केले. सुनैना नाईक व पूजा इरकल यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री गावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिन
अष्टे चंदगड येथील जय जवान माजी सैनिक संघटनेच्यावतीने 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. संघटनेचे संस्थापक सदस्य बी.जी.पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रतिमेचे पूजन सेक्रेटरी सुरेश लोहार यांनी केले. यावेळी संघटनेच्यावतीने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष एन.डी.लाड यांनी मनोगत व्यक्त हाते. यावेळी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
शेषगिरी कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
केएलई डॉ एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजीतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना योद्धे डॉ. गौतम एस. प्रेरणा कांबळे, मोनिका कोळी, नरेशकुमार व सुनिल सुभेदार यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी प्रा. बसवराज कटगेरी म्हणाले कोरोना काळात अनेकांनी जीवाची परवा न करतात रूग्णांची सेवा केली आहे. आता कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्याने आता चिंता करण्याचे कारण नाही.
प्रा. अमोघ किनागा म्हणाले भारतीय राज्य घटना ही सर्वात मोठी आहे. घटनेने राजकिय नितीमुल्ये, सत्ता, कर्तव्ये, अधिकार आणि जबाबदारी याचे महत्व अधोरेखीत केले आहे.
साक्षी देवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रेया कुरबेट यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. यशश्री व आदित्य यांनी सूत्रसंचालन केले. शषांक कुलगोड यांनी आभार मानले.
अनमोल तंगू धाम
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील ह्युमॅनिटी ग्रुपच्यावतीने वडगाव येथील ‘अनमोल तंगू धाम’ या संस्थेला भेट देऊन येथील अनाथ मुलांना आहार साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच चॉकलेट्स, केक, खेळाचे साहित्य यावेळी मुलांना देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक आणि ह्युमॅनिटी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. हा त्यांचा दहावा उपक्रम आहे.
बसरीकट्टी
बसरीकट्टी येथील द.म.शि. मंडळ संचलित श्री महालक्ष्मी हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष मारुती आमनगी होते. प्रास्ताविक स्वागत मुख्याध्यापक पी.जी.गावडे यांनी केले म. गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन शाळा सुधारणा कमिटी सदस्य यल्लाप्पा सांबरेकर तर डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष सिद्राई नागरोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
ध्वजारोहण एसडीएमसी अध्यक्ष मारुती आमनगी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शाळा सुधारणा कमिटी सदस्य परशराम शेरेकर, भरमा सांबरेकर, यल्लाप्पा चौगुले, मारुती शेरेकर, माजी विद्यार्थिनी नम्रता कंग्राळकर, अनुराधा कोंडसकोप उपस्थित होते. सुत्रसंचालन एस.एस.कांबळे यांनी तर आभार व्ही.एन.बंडाचे यांनी मानले.
कडोली
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री शिवाजी हायस्कूल कडोली ता. जि.बेळगाव शाळेत 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. जगभर पसरलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे नियमांचे पालन करत हा दिन साजरा करण्यात आला.
सारे जहाँ से अच्छा या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक व शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही.वाय.पाटील यांनी केले. स्वागत यु.जी.मुतकेकर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सल्लागार समिती सदस्य वाय.एस.चौगुले यांनी केले. तसेच मुख्याध्यापक व्ही.वाय.पाटील यांनी म.गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
ध्वजपूजन शाळेचे माझे विद्यार्थी एन.एल.पाटील यांनी केले. ध्वजारोहण सल्लागार समिती सदस्य ए.कटांबळे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. शाळेचा विद्यार्थी विवेक पाटील याने राष्ट्रगीत सादर केले. सूत्रसंचालन स्मिता पाटील यांनी केले.