वार्ताहर/ किणये
बेळगुंदी गावात कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे नागरिकांना भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने कोरोना लस उपलब्ध करून द्या व दवाखान्यामध्ये अधिक बेडची सोय करा व कोरोना तपासणीचा रिपोर्ट लवकरच द्यावा, अशा विविध मागणीचे निवेदन सोमवारी गावातील काही तरुणांनी बेळगुंदी प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले.
कोरोना तपासणीचा अहवाल देण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागत आहे. हा अहवाल दोन ते तीन दिवसात उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक केंद्रातर्फे वरिष्ठ अधिकाऱयांना कळवावे व ही सुविधा देण्यात आली.
कोरोना संशयित रुग्णांसाठी अधिक बेडची व्यवस्था करून गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत. या तिन्ही गावांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करून सर्वांसाठी लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱयांकडे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नारायण झंगरुचे, ज्ञानेश्वर पाटील, उत्तम झंगरुचे, दीपक पाटील, अनिल चव्हाण, सचिन सुतार, मारुती झंगरुचे आदी उपस्थित होते.
निवेदन देताना सामाजिक अंतराचे भान राखण्यात आले. तसेच मास्कचा वापर करण्यात आला. गर्दी टाळण्यासाठी म्हणून मोजक्याच पाच ते सहा कार्यकर्त्यांनी अधिकाऱयांकडे निवेदन दिले. उर्वरित कार्यकर्ते बेळगुंदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर उपस्थित होते.