नवी दिल्ली
: चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी विवोने भारतात प्रिमीयम गटातील स्मार्टफोन्सच्या माध्यमातून एक्स सिरीजअंतर्गत प्रवेश मिळवला आहे. प्रिमीयम गटातील स्मार्टफोन्सचे उत्पादन कंपनीकडून ग्रेटर नोएडात होणार आहे. या अंतर्गत कंपनी एक्स 50, एक्स 50 प्रो हे स्मार्टफोन्स सादर करणार आहे. प्रिमीयम गटातील स्मार्टफोन्सना वाढती मागणी लक्षात घेऊन आगामी काळात कंपनी या गटातील फोन्सच्या निर्मितीवर लक्ष केंद्रीत करणार आहे.