दुबई
स्मार्टफोन कंपनी विवो भारतामध्ये आपली उत्पादन क्षमता वाढवत असल्याचे समजते. चालू वर्षात भारतात स्मार्टफोन निर्यात सुरु करण्याची तयारी असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनी आपल्या प्रमुख उपकरणांमध्ये एक्स80 श्रेणी भारतात निर्मिती करणार आहे. कंपनी भारतामध्ये आपल्या उत्पादनांची क्षमता वाढवून वार्षिक सहा कोटी उपकरण इतकी करणार आहे. 2021 मध्ये कंपनीची उत्पादन क्षमता पाच कोटी होती अशी माहिती विवो इंडियाचे संचालक पैगाम दानिश यांनी दिली आहे. चालू वर्षात भारतात निर्यात सुरु करणार असून आगामी काळात उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देणार आहे. यामध्ये भारतीय बाजाराची मागणी पूर्ण करण्यासह मेड इन इंडिया उत्पादनांची निर्यातही करणार असल्याचे दानिश यांनी स्पष्ट केले आहे. विवोची 2022 मधील पहिल्या तिमाहीत भारताची स्मार्टफोन बाजारातील हिस्सेदारी 15 टक्के होती.