इपीएफओत डिसेंबरमध्ये जोडले गेले 14 लाख सदस्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोबाईल निर्मिती कंपनी विवोने आपला नवा विवो व्ही 23 इ 5 जी स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. सदरच्या फोनला 50 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार असून 26 हजार रुपयांच्या आसपास याची किंमत आहे.
50 मेगापिक्सलच्या ट्रिपल कॅमेरासह 44 मेगापिक्सलचा प्रंट कॅमेरा याला असून आय-ऑटो फोकस हे फिचर यात आहे. व्ही सिरीजच्या इतर फोनप्रमाणे हा नवा 5 जी स्मार्टफोनही अल्ट्रा-थिन डिझाइनने युक्त आहे.
सदरच्या फोनची किमत 25 हजार 990 रुपये असणार असून मिडनाइट ब्ल्यू आणि सनशाइन गोल्ड यासारख्या रंगात हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. विवो इंडियाच्या ऑनलाइन स्टोरवर तसेच फ्लिपकार्टवर सदरचा फोन खरेदी करता येईल. एचडीएफसी कार्डमार्फत खरेदी करणाऱयाला 2 हजारची सवलत असेल तर फ्लिपकार्टकडून ऍक्सिस बँकेच्या ग्राहकांना कार्डमार्फत 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
फोनची वैशिष्टय़े पाहुया
डिस्प्ले- 6.44 इंचाचा अमोलेड डिस्प्ले फुल्ल एचडी प्लस रेझोल्युशनसह
स्कॅनर- इन स्क्रीन फिंगर प्रिंट स्कॅनर
ऑपरेटिंग सिस्टम- अँड्रॉइड 12
कॅमेरा- ट्रिपल रियर कॅमेरा, 50 मेगापिक्सल, 8 मे. पि. अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2 मे. पि. मॅक्रो कॅमेरा, 44 मे. पि. चा आय ऑटोफोकस कॅमेरा
स्टोरेज- 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज बॅटरी- 4050 एमएएच, सोबत 44 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सुविधा