प्रतिनिधी /पणजी
दुबईमध्ये अडचणीत असलेल्या अनेकांना निस्वार्थीपणे सहकार्य करणाऱया मूळ गोमंतकीय विशांती कवठणकर यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कोरोनाच्या काळात अनेक भारतीय तसेच अनेक राष्ट्रांतील माणसे दुबईत अडकून पडलेली. त्यातच काहीजणांचे रोजगारही गेलेले. अशा सर्वांनाच विशांती कवठणकर यांनी मदतीचा हात देऊ केला. याची दखल या संस्थेने घेतली. भारतीय दुतावासात एका छोटेखानी कार्यक्रमात जे. एम. ग्लोबल ग्रुपचे चेअरमन डॉ. जितेंद्र मतलानी यांच्या हस्ते पुरस्काराच्या निमित्ताने प्रमाणपत्र सुपुर्द करण्यात आले. गेल्या वर्षीदेखील विशांती यांनी कोरोनाकाळात केलेल्या मदतीनिमित्त अशाच पद्धतीचच पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. विशांती या म्हापसा येथील आहेत.