जगन्नाथ मुळवी / मडकई
कोरोनाच्या कहरामूळे हजारोंच्या संख्येने नागरिक बाधीत होत असल्याने त्यांना होम आयझोलेशन मध्ये राहावे लागते. बाहेर पडण्यास बंदी असल्याने त्यांना कुणाच्या तरी आधाराची गरज असते. अशा प्रसंगी क्वचीत माणसे धावून येतात अणि त्यांना मदत करून जातात. संकटात सापडलेल्यांना अशा प्रसंगी त्या माणसात परमेश्वराचा साक्षात्कार होत असतो, कोरोना बाधितांचा दुवा बनून काम करीत असलेल्या विशांत मुकूंद नाईक यांच्या कार्यातून हाच साक्षात्कार झाल्याच्या प्रतिक्रीया मडकईतून उमटत आहे.
लाडेवाडा मडकई येथील पंच सदस्य वेशांत नाईक यांनी पहिल्या लाटेत कोरोना बाधितांसाठी भरपूर काम केलेले आहे. ‘कोरोना योध्दा’ म्हणून गौरव प्राप्त केलेले पंच सदस्य विशांत मुकूंद नाईक यांच दुसऱया लाटेतील कोरोना बांधितासाठीचे कार्य तोंडात बोटे घालणारे आहे. पहिल्या लाटेवेळी जिवावर उदार होऊन कोरोना बांधिताना आपल्या गाडीत घालून त्यांची चाचणी करून तो घेत होता. रूग्ण बाधीत सापडताच विशांत नाईक त्यांना आवश्यक असलेले जिन्नसही पुरवीत होता. त्यामुळे पारंपई व लाडेवाडा भागातील कोरोना बाधीत रूग्ण त्यांना दुवा देत होते.
हीच प्रेरणा व स्फुर्ती घेऊन विशांत नाईक यांनी या दुसऱया लाटेत 10 दिवस आयझोलेशनमध्ये असणाऱया बाधीतांसाठी आवश्यक असलेल्या गरजेच्या वस्तू उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यांचा आयझोलेशनचा कालावधी संपल्यानंतर त्यांचे घर स्वतः सेनिटायझ करून विशांत देत असतो. कुठलाही शुल्क ते न आकारता मानवतेच्या धर्मातून ते हे कार्य करतात. प्रसिध्दी पासून दूर राहून ते करीत असलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. मागच्या वेळी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा स्थानिक संस्थांनी त्यांचा गौरव केला होता. कोरोनाच्या संसर्गातून बळी गेलेल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. त्यावेळीची घरच्या मंडळीची केविलवाणी परिस्थिती न पाहण्यासारखी असते. अशावेळी हा कोरोना योध्दा विशांत त्यांच्यासाठी मोठा आधार वडच असतो. पूढाकार घेऊन सर्व अंत्यसंस्कार करण्यास साहाय्य करीत असतो.
मडकई पंचायतीचा पंच सदस्य म्हणून निवडून येण्याआधी त्यांची समाजसेवा सुरूच होती. ते उत्कृष्ठ भजनी कलाकार आहे. भजनी कलाकार म्हणून गोव्याच्या कानाकोपऱयात त्यांनी ही भजनसेवा सुरूच ठेवलेली आहे. व्यावहारीक कलाकार म्हणून मान्यता प्राप्त असली, तरी ते भजन हीच ईश्वरसेवा म्हणून मानतात. क्वचीत प्रसंगी ते बिदागी स्वीकारतात. मात्र पंच सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या प्रभागात आमदार सुदिन ढवळीकर यांच्या सहाय्याने भरपूर विकास केलेला आहे. कोरोना योध्दा म्हणून मानवतेचे कार्य करण्यासाठी त्यांना मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर व माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर यांचे खुप मोलाचे सहाय्य मिळत आहे. विकासाच्या शिरपेचात त्यांचे हे मानवतेचे कार्य उठून दिसत आहे. त्यांनी फक्त स्वतःच्याच प्रभागात व त्यांच्याच पंचायत क्षेत्रात काम केले नसून इतरही पंचायत क्षेत्रात त्यांच्या मित्र परिवार कोरोना बाधीत झाल्यामूळे त्यांच्या गावात जाऊन त्यांना आवश्यक वस्तू उपलब्ध करून देऊन त्यांचे संपूर्ण घर अथवा कार्यालय सेनिटायझ करून देण्याचे महत्त्वाचे कार्य तो स्वखर्चाने स्वतः करतो. त्यामुळे विशांत नाईक हा खऱऱया अर्थाने कोरोना योध्दा शोभतो……!