तरुण भारत ऑनलाइन टीम
छोट्या पडद्यावरील गेल्या तीन महिन्यांपासून चालू असलेला ‘बिग बॉस’ हा लोकप्रिय शो आहे .बिग बॉस मराठीचच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर विशाल निकम हा स्पर्धक बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे. विशाल निकमला २० लाख रक्कम आणि ट्रॉफी मिळाली आहे . खेळाडूवृत्ती, आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे विशाल नेहेमीच चर्चेत राहिला आहे . या पर्वामध्ये प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कॅप्टन्सीसाठी घरात घातलेल्या राड्यांचीही चांगलीच चर्चा होती. अखेर विशालने बिगबॉस च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल आहे. तसेच त्यानं सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. विशालने दख्खनचा राजा ज्योतिबा या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. तसेच त्याची जय भवानी जय शिवाजी मधील शिवा काशीथच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.