बेंगळूर
बेकायदा जमीन डिनोटिफिकेशनप्रकरणी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पुन्हा अडचणीत आले आहेत. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने येडियुराप्पा यांना समन्स बजावले असून चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे. माहिती तंत्रज्ञान कॉरिडोर निर्माण करण्यासाठी केलेल्या बेकायदा नोटिफिकेशन आरोपप्रकरणी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने 19 एप्रिल रोजी येडियुरप्पा यांना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे. न्यायाधीश बी. जयंतकुमार यांनी भ्रष्टाचार नियंत्रण कायद्याच्या सेक्शन 13(1)(ड) आणि 13(2) नुसार बी. एस. येडियुराप्पा यांच्याविरुद्ध फौजदारी प्रकरण दाखल केले असून समन्स बजावले आहे.