के. रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
के. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात विश्रुत स्ट्रायकर्सने झेवर गॅलरीचा तर अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने साई स्पोर्ट्सचा पराभव केला. रोशन जवळी (विश्रुत), झीनत मुडबागील (अर्जुन स्पोर्ट्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात झेवर गॅलरीने 20 षटकात 5 बाद 148 धावा केल्या. त्यात माजीद मकानदारने 54, पार्थ पाटीलने 49, सुदन्वा कुलकर्णीने 16 तर ओंकार वेर्णेकरने 12 धावा केल्या, विश्रुततर्फे मिथून एम., अर्जुन पाटील, तेजस पवार, अन्वरअली दोडमनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरात विश्रुत स्ट्रायकर्सने 19.5 षटकात 5 बाद 153 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. त्यात रोशन जवळीने 64, गोविंदा गावडेने 59 धावा केल्या. झेवरतर्फे किरण तरळेकरने 18 धावात 3 तर प्रथमेश पोवारने 1 गडी बाद केला. दुसऱया सामन्यात साई स्पोर्ट्सने 20 षटकात 5 बाद 127 धावा केल्या. त्यात यश कळसण्णावरने 30, सुशांत पाटीलने नाबाद 29, विनित अडुरकरने नाबाद 26 तर राहुल नाईकने 20 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे झीनत मुडबागीलने 26 धावात 2, स्वप्निल एळवेने 29 धावात 2, रोहित पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरात अर्जुन स्पोर्ट्सने 19.5 षटकात 7 बाद 129 धावा करून सामना 3 गडय़ांनी जिंकला. त्यात मुदस्सीर नाझीर व प्रसाद सुगूर यांनी प्रत्येकी 20 तर केदार होसुरकरने 16 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे विनित आडुरकरने 32 धावात 2 तर परिक्षित उकुंडी, आनंद कुंभार, प्रशांत मुतगेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे उर्जीत स्वामी, शहाबुद्दीन बॉम्बेवाले, तन्विर जीजूनी, भरत पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल विश्वनाथ यल्लीगार, सर्वाधिक षटकार यश कळसण्णावर, इम्पॅक्ट खेळाडू विनित आडुरकर, सामनावीर झीनत मुडबागील तर दुसऱया सामन्यात सुधाकर चाळके, नारायण भोसले, परशराम पाटील, वासीम धामणेकर यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल अमित यादव, सर्वाधिक षटकार गोविंदा गावडे, इम्पॅक्ट खेळाडू किरण तरळेकर, सामनावीर पुरस्कार रोशन जवळी यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
बुधवारचे सामने
साईराज वॉरियर्स वि. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स सकाळी 9 वा. दुसरा सामना लॉगर वि. डीके लायन्स दुपारी 1 वा.