कै. रत्नाकर शेट्टी स्मृती टी -20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
कै. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित कै. रत्नाकर शेट्टी स्मृती टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात विश्रुत स्ट्रायकर संघाने लॉगर संघाचा 3 गडय़ानी तर झेवियर गॅलरी संघाने साई स्पोर्ट्स संघाचा 1 गडय़ाने पराभव केला. अर्जुन पाटील (विश्रुत स्ट्राकयर), पार्थ पाटील (झेवियर) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर आयोजित या टी-20 स्पर्धेतील सामन्यात लॉगर संघाने 20 षटकात सर्व बाद 132 धावा केल्या. त्यान निलेश पाटीलने 52, पुनित दिक्षितने 34 धावा केल्या. विश्रुत स्टायकरतर्फे अर्जुन पाटीलने 17 धावात 4, रोहित पाटीलने 16 धावात 3 तर विजयकुमार पाटीलने 19 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल विश्रुत स्ट्रायकरने 17.1 षटकात 7 बाद 136 धावा करून सामना 3 गडय़ानी ज्ंिाकला. त्यात रोशन जवळीने 31 तर विजयकुमार पाटील व रोहित पाटील यांनी प्रत्येकी 24 धावा केल्या. लॉगरतर्फे अनंत माळवीने 41 धावात 3, अंगदराज हित्तलमनी, कैसर खजारी, हार्दिक ओझा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात साई र्स्पोट्स संघाने 19.3 षटकात सर्व बाद 123 धावा केल्या. त्यात यश कळसण्णावरने 52, परिक्षित उकुंडीने 22 धावा केल्या. झेवियर गॅलरीतर्फे पार्थ पाटीलने 13 धावात 4, किरण तारळेकरने 9 धावात 2, ताहिर सराफने 26 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल झेवियर गॅलरीने 20 षटकात 9 बाद 124 धावा करून सामना 1 गडय़ाने जिंकला. त्यात पार्थ पाटीलने 1 षटकार, 2 चौकारासह 30, किरण तारळेकरने 25, रूद्रगौडा पाटीलने 17, प्रथमेश लोहारने 13 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे महांतेश कुप्पण्णावरने 20 धावात 4, मदन बेळगावकरने 20 धावात 2, आनंद कुंभारने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे मल्लेश चौगुले, बसवराज रायगोळ, अशोक मण्णिगेरी, सिदराय मेत्री, रवि बस्तवाडकर यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल अमेय भातकांडे, सर्वाधिक षटकार यश कळसण्णावर, इम्पॅक्ट खेळाडू किरण तारळेकर, सामनावीर पार्थ पाटील तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे इजाजखान, महादेव लाड, शाहिद पिरजादे, शोहेब यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल रोहित पाटील, सर्वाधिक षटकार व इम्पॅक्ट खेळाडू निलेश पाटील, सामनावीर अर्जुन पाटील यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
सोमवारचे सामने : 1) साईराज वॉरियर्स वि. लॉगर स. 9 वा. 2) विश्रुत स्ट्रायकर वि. एक्स्ट्रीम दु. 1 वा.