प्रतिनिधी/ पणजी
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधला असता, शेळ-मेळावली पंचायतीवरील सर्व सदस्य हे माझेच समर्थक आहेत. पंचायत मंडळे ही माझ्यासोबतच आहेत. आयआयटी संदर्भात पंचायत मंडळाने मंगळवारी जो काही निर्णय घेतलेला आहे तो आपल्याला देखील मान्य आहे. परंतु, याप्रकरणी आपण कोणतेही भाष्य करणार नाही. हा विषय आपण पूर्णतः मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर ठेवलेला आहे. मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील, तो मला शिरोधार्ह आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी मी सहमत राहील, असे सांगितले.
ते पुढे म्हणाले की आता या विषयावर मुख्यमंत्री हेच स्वतः निर्णय घेतील. मी त्यात मुळीच हस्तेक्षेप करणार नाही. मुख्यमंत्री जो काही न्याय निवाडा देतील तो आपल्याला मान्य असेल. आता यानंतर शेळ मेळावली आयआयटी विषय मुख्यमंत्रीच हाताळतील. मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेतला तरी तो आपल्याला मान्य असेल, आपण याविषयी आग्रह करणार नाही असे निवेदन करून आरोग्यमंत्र्यांनी आयआयटी विषय सोडून दिल्याचे जवळपास मान्य केले आहे. या प्रकरणी चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टमध्ये लगावला आहे.