उदय सावंत /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील खोतोडा पंचायत क्षेत्रातील मलपण हरिजन वाडा येथील हरिजन कुटुंबातील दहावीत शिक्षण घेणाऱया तीन मुलांना मोबाईलअभावी ऑनलाइन पद्धतीच्या वर्गापासून वंचित राहावे लागत होते. यामुळे शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. यासंदर्भाची दखल घेऊन सत्तरी पत्रकार संघातर्फे आवाहन करुन यासाठी मदत करण्याची विनंती केली होती. याची दखल घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री तथा स्थानिक आमदार विश्?वजित राणे यांनी सदर तिन्ही मुलांना स्मार्टफोन देऊन त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली आहे. सत्तरी पत्रकार संघाने सामाजिक स्वरूपाचा उपक्रम हाती घेऊन एका गरीब कुटुंबातील मुलांसाठी सहकार्य केल्याबद्दल हरिजन बांधवातील कुटुंबांनी व हरिजन संघटनेने सर्वांचे अभिनंदन व आभार व्यक्त केलेले आहे. याबाबतची माहिती अशी की मलपण हरिजनवाडा येथील दीपिका हरिजन दिशीखा हरिजन, संजय हरिजनयानां शाळेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन पद्धतीचे शिक्षणाची सुविधा प्राप्त करण्यासाठी स्मार्टफोन अभावी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांना ऑनलाइन पद्धतीच्या वर्गाची सुविधा उपभोगता आली नाही. यामुळे त्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. सत्तरी पत्रकार संघाच्या काही सभासदांनी सदर भागाला भेट दिल्यानंतर ही परिस्थिती उदयास आली होती. यामुळे सतरी पत्रकार संघाने वेगवेगळय़ा स्तरावर सोशल मीडियाच्या माध्यमातूनआवाहन करून मदतीची विनंती केली होती . त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी आज सर्व मुलांना स्मार्टफोन प्रदान करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे या मुलांना आता ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. शिक्षणासाठी आपल्या मतदारसंघातील मुले वंचित राहणार नाही याची आपण विशेष दखल घेत असून यासंदर्भाची माहिती पत्रकार उदय सावंत यांनी आपल्याला दिल्यानंतर आपण सदर मुलांसाठी ही व्यवस्था केलेली आहे. आतापर्यंत सत्तरी तालुक्मयाच्या शैक्षणिक विकासासाठी आपले वडील व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. मलपण हरिजनवाडा येथील नागरिकांसाठी एका खास योजनेअंतर्गत घरे बांधून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते. याभागामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा प्राप्त करण्यात आलेल्या असून उर्वरित सुविधेच्या संदर्भात आपण विशेष लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या संदर्भात दीपिक दीपक हरिजन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना अनेक महिन्यापासून निर्माण झालेली समस्या आता विश्?वजित राणे यांच्या सहकार्यामुळे सुटल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्तरी पत्रकार संघाने आमच्या समस्येची दखल घेऊन यासंदर्भातआवाहन करण्यात आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी स्मार्टफोन उपलब्ध करून आम्हाला सुविधा प्राप्त करून दिलेली आहे. यामुळे आता ऑनलाईन पद्धतीच्या शिकवणीचा आम्हाला लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सत्तरी पत्रकार संघाचे आभार व्यक्त केलेले आहे. संजय हरिजन यांनी आपल्याला आनंद झालेला आहे. सरकारने ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणाला प्रारंभ करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आमच्या सारख्या गरीब कुटुंबासाठी स्मार्टफोन उपलब्ध करणे शक्मय नव्हते. सत्तरी पत्रकार संघ व आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी दिलेल्या सहकार्यामुळे आम्हाला शिक्षणाचा नवा मंत्र आता दिसू लागला आहे. या स्मार्टफोनचा वापर शिक्षणासाठी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.