प्रतिनिधी /बेळगाव
केएलई उन्नत शिक्षण आणि संशोधन विश्वविद्यालयाच्या विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालयात तेंडाशी संबंधित रोग झालेल्या रुग्णांना कमी दरात आणि कमी विकिरण दुष्परिणाम होण्याचे अत्याधुनिक सी.बी.सी.टी. यंत्र जिल्हय़ात प्रथमच बसविण्यात आले आहे.
डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय दंत वैद्य संघाच्या सहयोगाने व्ही. के. दंत विद्यालयाच्या ‘डेंटिस्ट्रि’ मध्ये सी.बी.सी.टी. ऍप्लिकेशन कार्यक्रमात हे यंत्र रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
समारंभाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. अलका काळे यांनी या यंत्रामुळे तोंडाचे कॅन्सर आणि रोगांचे निदान अगदी कमी खर्चात होईल, असे सांगितले. विद्यालयातील डॉक्टरांना या यंत्राचे उत्तम प्रशिक्षण दिले आहे, असे सांगितले. ओरल मेडिसिन आणि रेडियॉलॉजी विभागप्रमुख डॉ. वैशाली केळुसकर यांनी स्वागत केले आणि कार्यक्रमाची थोडक्मयात माहिती दिली. डॉ. शिवयोगी चरंतीमठ यांनी सी.बी.सी.टी बद्दल मार्गदर्शन दिले. या नवीन यंत्राची माहिती घेण्यासाठी बेळगावातील सर्व खासगी वैद्य, भारतीय दंत वैद्य संघ, बेळगाव विभागाचे पदाधिकारी, सदस्य, व्ही. के. दंत महाविद्यालयाचे सर्व अध्यापक वर्ग आणि कर्मचारी उपस्थित होते.
दंतवैद्यकीय विभागाच्या डीन डॉ. सोनल जोशी, उपप्राचार्या डॉ. अंजना बागेवाडी, डॉ. आदित्य आचार्य उपस्थित होते.