कुरुंदवाड / प्रतिनिधी
नृसिंहवाडी तालुका शिरोळ येथील वे. शा. स. कै. लक्ष्मण शास्त्री पुजारी यांचे मुंबई येथील नातू डॉक्टर विश्वनाथ वसंत पुजारी यांचा शासनाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
गेल्या सहा महिन्यापासून मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात कोरोना विभागात डॉ. विश्वनाथ पुजारी हे विना रजा कोरोना पॉझिटिव रुग्णावर उपचार करीत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना महामारी संसर्गाच्या काळातील त्यांच्या या सेवा कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली राजभवन मुंबई येथे त्यांचा शासनाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला