गेल्या वषीची विश्वसुंदरी हरनाझ संधू हिला एका असाध्य रोगाने पछाडले आहे. तिचे वजन अनियंत्रितरीत्या वाढत आहे. इतके, की तिला गव्हाची रोटी खाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. तिच्या स्थूलपणाची चर्चा आता सोशल मिडियावरही मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली असून हरप्रयत्न करूनही वजनवाढ काही थांबत नाही, अशी स्थिती आहे. सौंदर्य टिकविण्यासाठी ‘बॉडीशेपिंग’चा अतिरेक केल्याने ती या विचित्र रोगाची शिकार बनली असल्याचे तज्ञांचे मत आहे.
हरनाझ मात्र आपल्या वजनवाढीचे निराळेच कारण सांगते. इंटरनेटवर ज्या चर्चा चालू आहेत, त्या अतिरंजित असल्याचे तिचे मत आहे. ती सांगते, की तिला ग्लुटेन या पदार्थाची ऍलर्जी आहे. आपल्याला सिलिएक हा विकार झाल्याचे मात्र ती मान्य करते. हा रोग तिला जन्मापासून आहे. ग्लुटेन हे एक विशेष प्रकारचे प्रथिन असून ते गहू आणि मोहरीत अधिक प्रमाणात आढळते. हरनाझ पंजाबी असून पंजाबी लोक गव्हाची रोटी आणि सरसोंका साग म्हणजेच मोहरीच्या पानांची भाजी मुख्य आहार म्हणून घेतात. नेमक्मया याच दोन पदार्थांची तिला ऍलर्जी असल्याचे ती सांगते. सिलिएक विकार अशा प्रकारचा आहे, की ज्यात शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा शरीराच्याच विरोधात काम करते. याला ऑटोइम्युन रिऍक्शन असे म्हणतात. ग्लुटेनचे सेवन केल्यानंतर ही ऑटोइम्युन प्रतिक्रिया सुरू होते. त्यामुळे तिला ग्लुटेन असणाऱया कोणत्याही पदार्थाचे सेवन वर्ज्य करण्यात आले आहे. अतिसार, बद्धको÷, वात, पायांना मुंग्या येणे, रक्तक्षय, वांझपणा, हाडांची ठिसुळता, दातांचा रंग बदलणे, पोटदुखी, सूज इत्यादी लक्षणे सिलिएक विकारात दिसून येतात. या विकारावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कष्टाचे असते.