वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनची कनिष्ठांची विश्व बॅडमिंटन स्पर्धा न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे येत्या सप्टेंबर मध्ये आयोजित केली होते. दरम्यान कोव्हिड -19 संकटामुळे बॅडमिंटन फेडरेशनचे वार्षिक स्पर्धा वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. आता न्यूझीलंडमधील विश्व कनिष्टांची बॅडमिंटन स्पर्धा 18 ते 24 जानेवारी 2021 साली भरविली जाणार आहे.
सदर स्पर्धेच्या अगोदर विश्व बॅडमिंटन स्पर्धेची विश्व कनिष्ठांची मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धा 11 ते 16 जानेवारी दरम्यान घेतली जाणार आहे. याशिवाय, 2021 साली होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पात्रतेच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.