निहाल सरिन, डी.गुकेश, रक्षिता विजेते तर मृण्मयला तिसरे स्थान
वृत्तसंस्था / नागपूर
भारताचे कनिष्ठ गटातील सर्वोत्तम ग्रँडमास्टर्स निहाल सरिन व डी.गुकेश आणि महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रक्षिता रवि यांनी शानदार विजय मिळवित फिडे ऑनलाईन विश्व कॅडेट आणि युवा रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली. याशिवाय मृण्मय राजखोवाने कांस्यपदक मिळविले.
युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने रशियाच्या मुरझिन व्होलोदरवर आर्मागेडॉन डावात रोमहर्षक विजय मिळविला तर निहाल व रक्षिता यांनी अनुक्रमे अर्मेनियाचा ग्रँडमास्टर सर्गसियान शँट व चीनची महिला ग्रँडमास्टर साँग युझिनवर 1.5-0.5 अशा फरकाने निर्णायक विजय मिळविले. जेतेपदाच्या लढतीतील पहिले डाव अनिर्णीत राखल्यानंतर निहाल व रक्षिता यांनी दुसऱया डावात विजय मिळवित आघाडी घेतली. बिगरमानांकित मृण्मय राजखोवाने भारतासाठी आणखी पदक मिळवित स्पर्धेची सांगता केली. यू-10 खुल्या गटात राजखोवाने कांस्यपदक मिळविले.
यू-18 खुल्या गटातील अंतिम लढतीच्या पहिल्या डावात निहालने काळय़ा मोहरांनी खेळताना उत्तम बचावाचे प्रदर्शन करीत 46 चालीत बरोबरी साधली. पुढच्या डावात त्याने लौकिकाला साजेसा खेळ करीत चौथ्या मानांकित सर्गसियानवर पांढऱया मोहरांनी खेळताना विजय मिळविला. हा डाव त्याने 58 चालीत जिंकून आणखी एक विश्व स्पर्धेतील जेतेपद पटकावले. याउलट रक्षिताला मात्र जेतेपदासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. सहावे मानांकन असलेल्या रक्षिताने चीनच्या चौथ्या मानांकित साँगचा 39 चालीत पराभव केल्यानंतर दुसऱया डावात पांढऱया मोहरांनी खेळण्याचा लाभ घेत 35 चालीत विजय मिळविला.
रोमांचक ठरलेल्या यू-14 विभागातील अंतिम लढतीत गुकेश व रशियाचा व्होलोदर यांना पांढऱया मोहरांनी खेळण्याचा लाभ घेता न आल्याने दोन्ही डाव बरोबरीत राहिले. त्यामुळे विजेता ठरविण्यासाठी टायब्रेकर आर्मागेडॉन डावाचा अवलंब करण्यात आला. गुकेशने पांढऱया मोहरांची निवड केली आणि रोमहर्षक ठरलेल्या या डावात 62 व्या चालीत विजय मिळवित त्याने भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. यू-10 खुल्या गटात मृण्मय राजखोवाने अमेरिकेच्या वुडवर्ड अँडीला पराभवाचा धक्का दिला.
देत कांस्यपदक मिळविले. पहिल्या दोन डावात दोघांनी एकेक विजय मिळविल्याने आर्मागेडॉन डावावर निकाल लावण्यात आला. त्यात मृण्मयने 57 चालीत विजय मिळवित अमेरिकन प्रतिस्पर्ध्याला चकित केले. विश्व स्पर्धेतील त्याचे हे पहिलेच पदक आहे.