वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
विश्व सांघिक टेनिस हंगामाला रविवारी येथे प्रारंभ झाला. दरम्यान या स्पर्धेवेळी मास्कचा वापर सक्तीचा असल्याने टेनिस शौकिनांनी मास्कसह बऱयाच प्रमाणात उपस्थिती दर्शविली. विश्व सांघिक टेनिस स्पर्धेतील शिकागो स्मॅश आणि व्हेगास रोलर्स या दोन संघामध्ये सलामीची लढत खेळविली गेली.
अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम विजेती महिला टेनिसपटू स्लो स्टिफेन्सने माजी ऑलिपिंक विजेती मोनिका प्युएगचा 5-1 असा पराभव केला. या विजयामुळे शिकागो स्मॅशने व्हेगास रोलर्सला पराभूत केले. या स्पर्धेसाठी 500 शौकिनांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोरोना संदर्भातील सर्व नियमावलेंची अंमलबजावणी करण्यात आली होती. टेनिसपटू तसेच शौकिनांचे तापमान ठराविक कालावधीनंतर तपासण्यात आले आणि मास्कची सक्ती करण्यात आली होती.