ओटवणे / प्रतिनिधी-
सावंतवाडी प्रखंडातील शेर्ले या गावात विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून व मुंबईस्थित शेर्ले गावाचे सुपुत्र तथा एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाचे माजी एअर ट्रॅफिक कंट्रोलर अरुण वासुदेव धुरी यांच्या सौजन्याने धान्यादी साहित्याचे वितरण विश्व हिंदू परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा कोषाध्यक्ष रवी सातावळेकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी शेर्ले गावचे सरपंच उदय धुरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बांदा मंडळ प्रमुख स्वप्नील पाटगावकर, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड- मंत्री लक्ष्मीकांत कराड, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सुनील सावंत, गौरव शंकरदास आणि विश्व हिंदू परिषदेचे शेर्ले गावातील कार्यकर्ते व त्यांचे सहकारी उपस्थित होते.